Hindi Marathi English Spanish French German Dutch
Listen to this story (English).
शंकर भाऊराव छायरे आपल्यामागे चुरगळलेली आत्महत्येची चिट्ठी सोडून गेले ज्यावर असंख्य घड्या आणि वळ होते, ते असे दर्शवितात की बऱ्याच कालावधीपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. १४ एप्रिल, २०१८ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी गावातील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली.
छायरे यांच्या मालकीची नऊ एकर जमीन होती ज्यावर त्यांनी कापूस आणि सोयाबीन यांची लागवड केली होती- दोन्ही पिके ही २०१४-२०१६ आणि २०१९ ला असलेल्या दुष्काळाने पिकली नव्हती. छायरे यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून (डीसीसीबी) भारतीय रुपये १,००,००० (१४१२ युएस डॉलर्स) रुपये कर्ज आणि नातेवाईकांकडून ७०००० रुपये कर्ज घेतले होते. त्यांच्या आत्म्हत्येनंतर बँकेने त्यांचे कर्ज माफ केले.
त्यांच्या पत्नीने ग्लोबल ग्राउंड मिडिया: शी बोलतांना सांगितले: “त्यांनी चुरगळलेल्या आत्महत्या चिट्ठीवर लिहिणे याचा अर्थ होता की ते आत्महत्येचा विचार बऱ्याच दिवसांपासून करत होते. ते निराश झाले होते पण ही गोष्ट ते आपल्या कुटुंबाला सांगू शकत नव्हते.”
शंकर छायरे यांनी विष पिऊन आपले जीवन संपविले, त्यांच्या कुटुंबाच्या अनुसार त्यांनी ९ एकर शेतीवर घेतलेले रुपये १,००,००० च्या कृषी कर्जाची परतफेड ते करू शकले नाही. ते आत्महत्येपूर्वी चिट्ठी सोडून गेले ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी मोदी सरकारला दोष दिला . (२० जुलै २०१९, राजूरवाडी, यवतमाळ जिल्हा)
अलका, जिचे लक्ष आता शेतीकडे आहे, तिला कर्जाच्या व्याजदराबद्दल माहिती नाही किंवा छायरे यांनी कोणते कर्ज फेडले याबद्दल माहिती नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला-महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी १,००,००० रुपयांची -सानुग्रह रक्कम तिला मिळाली.
याचप्रमाणे, शेतकऱ्यांच्या कुटुंबाने माहिती दिल्याप्रमाणे, बोथबोडन गाव, यवतमाळ येथील शेतकरी असलेले वडील आणि मुलाने एका महिन्यांच्या कालावधीत त्यांच्यावर विविध बँकेची आणि सावकारांची कर्जे असल्याकारणाने आत्महत्या केली. वडील, ५० वर्षीय चरण दगडू राठोड यांनी ३० जानेवारी २०१७ ला आत्महत्या केली आणि त्यांचा जवळपास २३ वर्षीय असलेला मुलगा लहू दगडू राठोड याने २४ मार्च ला विष पिऊन आत्महत्या केली.
चरण राठोड यांचा दुसरा मुलगा अंकुश, ज्याची ५ एकर शेती आहे त्याने सांगितले की त्याच्या वडिलांना खाजगी सावकार सातत्याने धमकी देत होते.” त्यांचे पिक दुष्काळामुळे पिकले नव्हते. माझ्या वडिलांचे यवतमाळ डीसीसी बँकेचे ७०००० रुपयांचे (९८८ युएस डॉलर्स) कर्ज आणि तीन खाजगी सावकारांकडून व्याजदर २० ते ३० टक्के असलेले १५०००० रुपयांचे (युएस डॉलर्स २११९) कर्ज होते. खाजगी सावकारांनी त्यांच्याकडे त्यांची जमीन ज्यावर त्यांचे राहते घर होते ते काढून घेण्याची धमकी दिली होती. अश्याच्ग एका धमकीमुळे त्यांनी विष घेतले होते.”
त्याचा भाऊ लहू याच्या आत्महत्येबद्दल अंकुश ने सांगितले: “मोठा भाऊ या नात्याने लहू ला आपल्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आणि कुटुंबाची काळजी घेण्याच्या जबाबदारीची जाणीव होती. तो फक्त २३ वर्षांचा होता. दबावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली.”
राज्य सरकारने कुटुंबाला मदत म्हणून १००००० (युएस डॉलर्स १४१२) दिले आणि यवतमाळ डीसीसी बँकेचे ७०००० रुपयांचे (९८८ युएस डॉलर्स) कर्ज माफ केले. पण लहुच्या आत्म्हेत्येसाठी कोणतीही मदत मिळाली नाही कारण जमिनीची मालकी वडिलांच्या नवे होती.
दोन महिन्यांनी चरण राठोड यांच्या आत्महत्येनंतर, लहू राठोड यांनी विष पिऊन आपले जीवन संपविले. आपल्या वडिलांनी घेतलेले ६४०००० रुपयांच्या कर्जामध्ये त्याला रुपये २५०००० चे व्यक्तिगत कर्ज फेडायचे आहे. आताच्या काळात, त्याचा भाऊ अंकुश ला उरलेले कर्ज फेडायचे आहे. (२१जुलै २०१९, बोथबोडन,यवतमाळ जिल्हा)
कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या
वरील सर्व आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत तफावत आहे. अमरावती येथे जुलै २०१९ ला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या ग्लोबल ग्राउंड मिडिया कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत असे आढळून आले की मुख्यतः पुढील सतत अनेक वर्षांमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीमुळे, दुष्काळामुळे आणि अनेक घेतलेल्या कर्जांची परतफेड न करता आल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
कार्यकर्ता जितेंद्र घाडगे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) माहिती मागवली असता निदर्शनास आले की महाराष्ट्रात जानेवारी २०१५ ते २०१८ च्या अखेरीस ११,९९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मागील ३ वर्षांच्या तुलनेत यात ९१ टक्के वाढ झाली. यामध्ये ३६.५ टक्के म्हणजे ४३८४ आत्महत्या या एकट्या महाराष्ट्रातील अमरावती विभागात ज्यामध्ये अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांचा समवेश आहे.
याकाळात, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) ने सांगितले की २०१५ च्या शेवटी अपघाती मृत्यू आणि आत्महत्या यासाठी प्रचलित केलेल्या सांख्यिकी अनुसार, ‘बँकाची दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा’ हे शेतकऱ्यांचे/जमीन लागवड करणाऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण आहे. महाराष्ट्रात झालेल्या सर्व आत्महत्येंपैकी १२९३ आत्महत्या म्हणजे ४२.७% आत्महत्या या ‘बँकाची दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा’ यामुळे झालेल्या आहेत.
एकंदरीत, एनसीआरबी ची माहिती दर्शविते की शेतकरी आणि जमीन लागवडकरणारे यांच्या ३०९७ आत्महत्या या ‘बँकाची दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा’ यामुळे झालेल्या आहेत. यापैकी, २४७४ शेतकरी/जमीनधारक म्हणजे ८० टक्के जणांनी त्यांचे कर्ज हे बँक आणि नोंदणीकृत मायक्रोफायनान्स (एमएफआय) अर्थसंस्थेकडून घेतले होते. ३०२ शेतकऱ्यांचे कर्ज हे सावकारांकडून घेतले होते आणि ३२१ शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज हे दोन्ही स्त्रोत म्हणजे आर्थिक संस्था किंवा सावकार किंवा बिगर वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून घेतले होते.
शेतमजूर ज्यांनी ‘बँकाची दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा’ मुळे आत्महत्या केली त्यांनी आर्थिक संस्था आणि बिगरवित्तीय संस्था/सावकार यांच्याकडून कर्ज घेतले होते त्यांची अनुक्रमे संख्या 155 आणि ११० होती.
एनसीआरबी यांनी शेतकरी/जमीनधारक यांची व्याख्या केली आहे की शेतकरी/जमीनधारक म्हणजे जे स्वतः अथवा शेतमजूर यांच्या सहाय्याने शेतीमध्ये पिकाची लागवड करतात, यामध्ये शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती ज्यांचे उत्पन्न हे शेतीमध्ये मजुरी करून मिळते.
एनसीआरबी कडून अपघाती मृत्यू आणि आत्महत्या यांची माहिती २०१६ नंतर प्रकाशित केली गेलेली नाही. सर्वात अलीकडच्या काळात प्रकाशित केलेल्या एनसीआरबी माहिती २०१६ मध्ये नमूद केले आहे की ११,३७९ शेतकरी आत्महत्या; या २०१५ मध्ये नोंद केलेल्या १२,६०२ आत्महत्येच्या तुलनेत ९.७ % कमी झाल्या आहेत. २०१५ प्रमाणे, २०१६ च्या सांख्यीकीत राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर्शविलेल्या नाहीत.
संस्थात्मक स्त्रोत, एनएबीएआरडी (नाबार्ड) नुसार अखिल भारतीय ग्रामीण वित्तीय समावेशी सर्वेक्षण २०१६-१७, संस्थात्मक कर्ज हे २०१५-२०१६ करिता कृषी सामग्री साठी ६०.५ टक्के इतके होते. यापैकी ३०.३ सामान्य कर्ज हे बिगरवित्तीय संस्था जसे मित्र, नातेवाईक, सावकार, जमीनदार यांचेकडून घेतले होते, आणि ९.२ टक्के कर्ज हे दोन्ही म्हणजे वित्तीय आणि बिगरवित्तीय संस्थेकडून घेतले होते.
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशियल सायन्सेस चे कृषी अर्थतज्ञ प्रा. आर. रामकुमार म्हणतात: “ शेतीची समस्या ही वेगवेगळ्या स्तरातील, जातीतील आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाढते आहे. त्यांचे कर्ज वेगवेगळ्या स्त्रोतांकडून घेतले गेले होते. यामध्ये एका स्त्रोताकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या स्त्रोताकडून कर्ज उचलले गेले होते. रोख रक्कम अश्या पद्धतीने फिरविली गेली होती. यामध्ये सावकार उघडपणे सहभागी नव्हते, कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या कर्जाच्या वेळी सावकाराचा सहभाग असावा.”
—
If you need help or know someone who does, please reach out now through a suicide hotline near you.
Article by Urvashi Sarkar.
Editing by Mike Tatarski and Anrike Visser.
Fieldwork by Varsha Torgalkar.
Research by Peter Allen Clark.
Picture by Abhaya Gupta.
Illustrations by Imad Gebrayel.
This article was developed with the support of the Money Trail Project (www.money-trail.org).
Global Ground is investigative, independent journalism. We’re ad-free and don’t sell your personal data, so we mainly depend on donations to survive.
If you like our stories or think press freedom is important, please donate. Press freedom in Asia is under threat, so any support is appreciated.
Thanks in advance,
The Global Ground Team
You must be logged in to post a comment.